top of page

EPFO 3.0 लवकरच होणार लॉन्च; 9 कोटी लोकांना होणार थेट फायदा, या' 5 मोठ्या बदलांवर एकदा नजर माराच!

  • लेखक की तस्वीर:  wix2266@gmail.com
    wix2266@gmail.com
  • 29 मई
  • 2 मिनट पठन

EPFO 3.0: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच आपलं नवीन प्लॅटफॉर्म EPFO 3.0 लॉन्च करणार आहे. या IT प्लॅटफॉर्मद्वारे सदस्यांना बँकेसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, हे नवं सिस्टिम मे ते जून 2025 दरम्यान कार्यान्वित केलं जाईल.
EPFO 3.0: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच आपलं नवीन प्लॅटफॉर्म EPFO 3.0 लॉन्च करणार आहे. या IT प्लॅटफॉर्मद्वारे सदस्यांना बँकेसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, हे नवं सिस्टिम मे ते जून 2025 दरम्यान कार्यान्वित केलं जाईल.

9 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना होणार फायदा

त्यांनी सांगितलं होतं की, EPFO 3.0 हे एक विश्वासार्ह आणि सक्षम प्लॅटफॉर्म असेल, जे आपल्या 9 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना कोणतीही अडचण न येता अनेक नवीन सुविधा प्रदान करेल. उदाहरणार्थ, क्लेमचं सेटलमेंट ऑटोमॅटिक होईल, डिजिटली चुका सुधारल्या जातील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक खात्यातून पैसे काढतो तसं एटीएममधून थेट पीएफमधील पैसेही काढता येतील. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की EPFO 3.0 मध्ये कोणकोणते नवीन बदल होणार आहेत. जाणून घेऊयात...


EPFO 3.0 मध्ये होणार 'हे' पाच मोठे बदल 

1. पीएफमधील पैसे काढण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा जास्त सोपी आणि जलद होणार आहे. क्लेमचं सेटलमेंट आपोआप (ऑटोमॅटिक) होणार असून, यासाठी मॅन्युअल प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही.

2. क्लेम मंजूर झाल्यानंतर थेट एटीएममधून बँक खात्यासारखे पैसे काढता येणार आहेत.

3. तसेच, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन तुमच्या खात्यात दिलेल्या कोणत्याही माहितीमध्ये सुधारणा करू शकता, ज्यामुळे फॉर्म भरण्याचा त्रास संपणार आहे. 

4. EPFO आता अटल पेन्शन योजना आणि पंतप्रधान जीवन विमा योजना यांसारख्या इतर सामाजिक सुरक्षा योजनांना आपल्या सिस्टममध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. जेणेकरून असंघटित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांनाही पेन्शन आणि सुरक्षेचे अधिक चांगले फायदे मिळू शकतील.

5. आता मोठे फॉर्म भरण्याऐवजी ओटीपीच्या माध्यमातून आवश्यक बदल जलद आणि सुरक्षित पद्धतीने करता येणार आहेत. याशिवाय, EPFO ने पेन्शनधारकांसाठी सुविधा वाढवण्यासाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली (CPPS) सुरू केली आहे. या अंतर्गत, देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनची रक्कम मिळवता येणार आहे. या पावलामुळे पेन्शनर्सना मोठी सोय होणार आहे.

ESIC आरोग्य सेवा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) देखील आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत आहे. लवकरच ESIC चे लाभार्थी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सरकारी, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांचा लाभ घेऊ शकतील. सध्या ESIC देशभरातील 165 रुग्णालयांच्या माध्यमातून सुमारे 18 कोटी नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवत आहे.


टिप्पणियां


bottom of page